सोलापूर -: जैन समाजाला ज्या प्रमाणे महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळवून दिला, त्याप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. वीरशैव समाजाची ही मागणी जुनी आहे, ती पूर्ण करण्यासाठी माझे आवश्यक ते सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात ऑल इंडिया वीरशैव महासभा महाराष्ट्र विभागाच्या वतीने रविवारी (दि. 7) दुपारी वीरशैव लिंगायत महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील आमदार व खासदार तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. महासंमेलनातील अध्यक्षीय भाषणात शिंदे म्हणाले, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वीरशैव समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. मी देखील त्यासाठी प्रय}शील आहे. गरज पडल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी या विषयी चर्चा करेन. मात्र समाजाचे काम करणार्यांनी याचा पाठपुरावा केला पाहिजे. आपण मंत्र्यांना निवेदन दिले म्हणजे आपले काम झाले, असे नाही. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, असा चिमटा त्यांनी या वेळी काढला. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना उजाळा देताना शिंदे म्हणाले, बसवेश्वरांच्या विचारात मानवतेला एकसंध बांधण्याची शक्ती आहे. बसवेश्वरांनी आयुष्यभर सर्वधर्मसमभाव या विचारांची पूजा केली. आज अशाच विचारांची गरज आहे, असे ही शिंदे म्हणाले. गहिनीनाथ औसेकर महाराज व ऑल इंडिया वीरशैव महासभेचे अध्यक्ष भीमण्णाजी खंद्रे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात वेदघोषानी झाली. माजी आमदार तथा ऑल इंडिया वीरशैव महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वनाथ चाकोते यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा कर्नाटकी पगडी, लिंगाचा हार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राज्याचे दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण, औसाचे आमदार बसवराज पाटील, कर्नाटकचे आमदार एम. बी. पाटील, ईश्वर खंद्रे, महापौर अलका राठोड, ऑल इंडिया वीरशैव महासभा महाराष्ट्र राज्याचे महिला समितीच्या अध्यक्षा उमा नाईक, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, र्शी. कंठेश्वर महास्वामी, शैलेश शिवराज पाटील चाकूरकर, भाऊ आंधळकर, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर शिवदारे, कर्नाटकचे आमदार दत्तात्रय पाटील, जी. एस. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी वीरशैव भूषण पुरस्काराचे व वीरशैवरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.