नळदुर्ग -: ओमनी कारच्या समोर सायकलस्वार आडवा आल्याने शाब्दिक चकमक होवुन जातीवाचक शिवीगाळ करून काठी व लाथा, बुक्कीने झालेल्या तुफान मारहाणीत एका गंभीर जखमी दलित इसमाचे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मयत हा निवृत्त पोलिस कर्मचा-याचा मुलगा असुन सध्या सोलापूर येथे ते वास्तव्यास आहेत. ही घटना जळकोट (ता. तुळजापूर) येथे रविवार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका प्रमुख आरोपीसह 60 जणावर खुनाचा व अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद चंद्रकांत गायकवाड (रा. केशवनगर पोलिस वसाहत, सोलापूर) असे उपचारावेळी मरण पावलेल्या दलित इसमाचे नाव आहे. तर बंकट बेडगे (रा. जळकोट ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. यातील निवृत्त पोलीस कर्मचारी चंद्रकांत बाबुराव गायकवाड (रा. केशवनगर सोलापूर) हे आपल्या कुंटूबियासह राष्ट्रीय महामार्गाने सोलापूरकडे जात असताना वाटेत जळकोट येथे वडापाव गाडीवर नाष्टा करुन गायकवाड कुंटुबिय आपल्या ओमनी (क्रं. एम. एच. 13/एसी.4289) मधुन निघाले असता कारच्यासमोर आडवा आलेल्या सायकलस्वारास आंनद याने सायकल निट चालव असे म्हटल्याचा राग मनात धरुन सायकलस्वाराने 50 ते 60 लोकाचा जमाव जमवुन चंद्रकांत गायकवाड याना शिवीगाळ करुन गाडीच्या पाठीमागे काचेवर असलेले चक्राचे चिन्ह पाहून त्यांचा मुलगा आनंद गायकवाड यास हाताने, लाथाबुक्क्याने, काठीने सर्व अंगावर मारहाण केली व जातीवादक शिवीगाळ केली. आनंद गायकवाड यास उपचारासाठी सोलापूर रुग्णालयात दाखल केले असता साडे सहा वाजता उपचारादरम्यान तो मरण पावला. अशी फिर्याद चंद्रकांत बाबुराव गायकवाड यांनी सोलापूर जेलरोड पोलिसात दिल्यावरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात सोमवार रोजी वरील आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर, पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी भेट दिली. सोमवार रोजी जळकोटमध्ये तणावपूर्ण शांतता होती. व्यापा-यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे हे करीत आहेत.