सांगली -: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत कॉंग्रेसने सत्ता मिळविली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा दणका बसला आहे. कॉंग्रेसने 40 जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली. सत्ता स्थापनेचा जादुई आकडा 37 आहे. तो कॉंग्रेसने सहज मिळविला. मनसेनेही सांगलीमध्ये खाते उघडले असून एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभव पत्कारावा लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीचाही धुव्वा उडविला. शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइंसह सहकारी पक्षांची मिळून बनलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीला केवळ 9 जागा मिळाल्या. त्यातही शिवसेनला एकही जागा जिंकता आली नाही.
माजी उपमहापौर शेखर इनामदार यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच किरण सुर्यवंशी, विजय हबळे, मुन्ना कुरणे, लक्ष्मण नवलाई, शीतल पाटील, नंदकुमार देशमुख यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे सुरेश अवटी आणि निरंजन आवटी या पितापुत्रांनीही विजय मिळविला आहे. दोघांनी मिरजेतूनच निवडणूक लढविली होती.
विद्यमान उपमहापौर युवराज बावडेकर विजयी झाले आहेत. विद्यमान नगरसेवक राजेश नाईक, दिग्विजय सुर्यवंशी यांचाही विजय झाला आहे.
नवरा बायकोच्या 3 जोड्या निवडून आल्या आहेत. एका ठिकाणी आई सासू आणि मुलगा असे तिघे विजयी झाले.
राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान जिंकले. तर कॉंग्रेसचे किशोर जामदार हेदेखील विजयी झाले.
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रविवारी मतदान झाले होते. यंदा 63 टक्के मतदान झाले. मतमोजणीला सर्वसाधारणपणे सकाळी 8 वाजता सुरुवात होते. परंतु, यावेळेस सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निकाल जाहीर
कॉंग्रेस - 40
राष्ट्रवादी कॉंग्रेस- 18
स्वाभिमानी विकास आघाडी- 8
अपक्ष- 9
मनसे 1