कळंब -: सुनिल फर्म इंजिनअरींग कंपनी लि., मुरुड जि. लातूर या कंपनीत कामाला असणा-या चार व्यक्तींनी काम पूर्ण झालेल्या बीओटी तत्वारील गाळयाची परस्पर विक्री करुन जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांना चुना लावून फसवणूक केल्याप्रकरणी कळंब पोलिसात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कळंब नगरपरिषदेच्यावतीने सुनिल फर्म इंजिनअरींग लि., कंपनी मुरुड, जि. लातूर यांनी न.प. ला बीओटी तत्वावर गाळे बांधून देण्यासाठी कंत्राट दिले होते. अनिल रमेश पांडे, सुरेश भद्रिनाथ झंवर, अनिरुध्द पदमाकर जाधव (तिघे रा. जळगाव), अलदा वारवाडकर (रा. चिपळूण) हे चारजण या सुनिल फर्म कंपनीत कामाला होते. कंपनीने काही काम अपूर्ण ठेवले व पूर्ण झालेल्या गाळयाचे काम हे गाळे मालकाच्या व कंपनीच्या परस्पर ग्राहकांना कळंब येथील दुयम निबंधक कार्यालयात गाळेचे करार करुन चक्क फर्मची व नगरपरिषदेची आणि शासनाचे दोन कोटीची फसवणूक (दि. 1 जून 2010 ला) केल्याची उघड होताच कंपनीचे मालक दिपक आप्पासाहेब पाटील (रा. मुरुड, जि. लातूर) यांनी कळंब पोलिसात धाव घेऊन अनिल पांडे, सुरेश झंवर, अनिरुध्द जाधव, अलदा वारवाडकर यांच्याविरुध्द फिर्याद देवून वरील चौघांविरुध्द कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एन. शेळके हे करत आहेत. गुन्हा दाखल होताच न.प. च्या गाळा खरेदी धारकामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.