कळंब -: येथील नवीन सराफ लाईनमध्ये अज्ञात चोरटयाने दीड लाख रुपये किंमतीची असलेली सोन्याचांदीची बॅग लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवार दि. 8 जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुधीर नागनाथ डांगे हे नेहमीप्रमाणे घरातून सोन्याचांदीचे दागिने असलेली बॅग स्कुटी गाडीवर अडकावून नवीन सराफ लाईनमध्ये दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानासमोर गाडी उभी केली. यावेळी दुकानाचे कुलूप उघडत असताना अज्ञात चोरटयाने स्कूटीवर अडकावलेली दागिन्याची बॅग लंपास करुन नेले. या बॅगेत सुमारे 1 लाख 59 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने होते. याबाबतची फिर्याद पोलिसात सुधीर नागनाथ डांगे (वय 65 धंदा सराफ दुकान, रा. कळंब) यांनी दिल्यावरुन अज्ञात चोरटयाविरुध्द कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. बाचके हे करीत आहेत.
 
Top