नळदुर्ग -: बिहार राज्यातील बुध्दगया महोबाधी महाबौध्द विहार परिसरात झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणाचा रिपाइं तुळजापूर तालुका शाखेच्यावतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आला असून बॉम्ब स्फोट करुन सामान्य जनतेत दहशत निर्माण करणा-या नराधमाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर याना रिपाइंच्यावतीने एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्या म्हटले आहे की, दि. 7 जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान बुध्दगया महाबोधी बुध्द विहार परिसरात साखळी बॉम्बस्फोट करुन येथील बौध्द बांधवाचे जागतिक पातळीवरील श्रध्दास्थान असलेले महाबोधी बौध्द विहार उध्दवस्त करण्याचा काही समाज कंटकानी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. या बौध्द विहारात ठेवण्यात आलेले दोन जिवंत बॉम्ब बॉम्बनाशक पथकाने वेळीच दक्षता घेवून ते नामशेष केल्याने मोठा अनर्थ टळला. सदर प्रकार हा मानवतेला काळीमा फासणारा असून निंदनीय आहे. या बॉम्ब स्फोट प्रकरणाचा रिपाइंच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असून सदर प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करुन संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनादवारे करण्यात आली आहे.
    निवेदनवार रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, युवा आघाडी तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, बाबासाहेब बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, अशोक अलकुंटे, प्रविण राठोड, महादेव कांबळे, विलास गायकवाड सह कार्यकर्त्यांच्या सहया आहेत.
 
Top