पंढरपूर -: बिहारमधील महाबोधी परिसरात रविवारी पहाटे झालेल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे. बौद्ध भिक्षू बनून दहशतवादी महाबोधी परिसरात घुसल्याची माहिती समोर आली आहे. पंढरपूर येथेही वारकर्‍यांच्या वेशभूषेत‍ दहशतवादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील लाखो भाविक पंढरपूरात दाखल होतात. अशा गर्दीच्या फायदा घेऊन अनुचित प्रकार होऊ शकतो. त्यामुळे मंदिराच्या सुर‍क्षा व्यवस्थेत वाढ करण्‍यात आली आहे. आता दिवसातून तीन वेळा विठ्ठल मंदिर आणि परिसराची बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.  याशिवाय मंदिर परिसरात अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो 24 तास गस्त घालत आहेत. मंदिरात येणार्‍या प्रत्येक भाविकाची तपासणी धातूशोधक यंत्राच्या सहाय्याने तपासणी केली जात आहे.

 
Top