नागपूर :- पंतप्रधानपद म्हणजे हातगाडीवर मिळणारी पाणीपुरी नाही. त्या जागी ख-या अर्थाने लायक व्यक्ती यायला हवी. त्यामुळे आम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहोत, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
पतंजली योग समिती, किसान पंचायत आणि भारत स्वाभिमान चळवळीच्या वतीने राज्यातील कार्यकर्त्यांच्या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी रामदेव नागपुरात आले होते. या वेळी बोलताना त्यांनी कॉँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबावर सडकून टीका केली. काँग्रेस हे देशावरील राष्ट्रीय संकट असल्याचे सांगताना 2014 ची निवडणूक ही देशाच्या राजकारणात आमूलाग्र परिवर्तन घडवणारी ठरणार आहे. एकीकडे देशाची 67 वर्षे लूट करणारे कुटुंब आहे. या कुटुंबाने देश किती लुटला, याचा हिशेब व्हायला हवा. परकीय बॅँकांमध्ये या कुटुंबाने 20 लाख कोटींचे बेनामी फिक्स डिपॉझिट ठेवल्याचा आरोप रामदेवबाबा यांनी केला. या कुटुंबापासून देशाला मुक्ती द्यायची असेल तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही. एक नेता उत्तराखंडात संकटात सापडलेल्या जनतेला मदतीसाठी धावून जातो. त्याच वेळी दुसरा विदेशात मौजमजा करण्यात मग्न असतो. यातच सारे काही आले.