बीजिंग -: चीनचे माजी रेल्वेमंत्री लिऊ झिझून यांना सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सोमवारी स्थानिक न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यांच्या कार्यकाळात जवळपास २५ वर्षे त्यांनी सुमारे दोन कोटी डॉलरची लाच स्वीकारली असल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
      तसेच लिऊ यांना सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली. २००३ ते २०११ या काळात ते चीनचे रेल्वेमंत्री होते व त्यांच्या काळात चीनमध्ये विविध ठिकाणी अतिजलद रेल्वेमार्गाचे जाळे उभारण्यात आले होते.
 
Top