सोलापूर -: देवाची गाडी म्हणून ओळखली जाणारी सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या वेळेत आज सोमवार, दि. 1 जुलैपासून बदल होणार आहे.
सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस दिवसा धावत होती. या गाडीची वेळ बदलून ही गाडी रात्री धावणार आहे. सोलापूर-कोल्हापूर दररोज रात्री सोलापूर रेल्वे स्थानकावरुन रात्री 11.35 वाजता सुटणार आहे. ही गाडी वाजता 1 वाजता कुर्डुवाडी, मोडनिंब येथे 1.25 वाजता, पंढरपूर येथे 2 वाजता, सांगोला येथे 2.30 वाजता, ढालगाव येथे 3.10 वाजता, मिरज येथे 4.55 वाजता तर कोल्हापूर येथे सकाळी 6.20 वाजता पोहोचणार आहे.
त्याचदिवशी कोल्हापूर-सोलापूर गाडी क्रमांक 11052 कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरुन रात्री 11.55 वाजता सुटणार आहे. ही गाडा मिरज येथे 1.05 वाजता, ढालगाव येथे 2.23 वाजता, सांगोला येथे 5 वाजता, मोडनिंब येथे 5.33 वाजता, कुर्डूवाडी येथे 5.58 वाजता तर सोलापूर येथे 7.45 वाजता पोहोचणार आहे.
या गाडीमुळे रेल्वे प्रवाशाची सोय होणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधान व्यत होत आहे. या आधी ही गाडी सकाळी होती. त्यास प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता ही वेळ सोयीची झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रवाशांनी सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रसेच्या वेळेचा बदल लक्षात घेवून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक सुशिल गायकवाड यांनी केले आहे.