उस्मानाबाद :- लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, उस्मानाबाद महामंडळाच्यावतीने शिष्यवृत्तीची योजना सन 2012-13  या वर्षात 10 वी, 12 वी पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय, अभियांत्रिकी अभ्याक्रमासाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी व विद्यार्थींनी या या शैक्षणिक वर्षात 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण घेवून उत्तीर्ण झालेल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येणार आहे.
         विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपले अर्ज 5 जुलैपर्यंत अर्ज सादर करावा. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रशनकार्ड, टि. सी, मार्कलिस्ट, ॲडमिशन घेतल्याची पावती, पासपोर्ट साईजचे प्रत्येकी दोन छायाचित्रासह पाठवावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top