उस्मानाबाद -:  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी के.एम. नागरगोजे यांनी कै. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. अप्पर जिल्हाधिकारी राम मिराशे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतिनिमित्त येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या उस्मानाबाद कार्यालयातही त्यांना अभिवादन करण्यात आले.
      यावेळी  बापु जाधव, सी डी. गायकवाड, बाबासाहेब अंधारे, पांडु पोवाडे, संजय मुकेरकर, रामभाऊ देवकर , डी. आर. गायकवाड  आदि उपस्थित होते.
 
Top