नांदेड -: येथील अशोकनगर भागातील जेष्ठ नागरीक व जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशवराव रामराव देशमुख अर्धापूरकर (वय 83 वर्षे) यांचे रविवारी दि. 30 जून रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट येथील स्मशान भूमीत दि. 1 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, जावाई, नातू असा मोठा परिवार आहे. पत्रकार नागनाथ देशमुख यांचे ते वडिल होत.
अर्धापूर येथील मूळचे रहिवाशी असलेले केशवराव अर्धापूरकर यांनी शिक्षकी पेशा स्विकारल्यानंतर शाळांमधून विविध उपक्रम राबविले. देशमुख यांनी वारकरी संप्रदायावर व संत वाङमयावर रचित संतावर किर्तनेही केली. त्यांनी ज्योतीषी शास्त्राचा अभ्यास होता. मल्टीपर्पज विदयालय, देगलूरे, तरोडा आदी शाळांतून त्यांनी काम केले. सन 1976 साली नांदेड जिल्हापरिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भाजपाचे नेते राम पाटील रातोळीकर, सुधाकर पांढरे, माजी आ. गंगाराम ठक्करवाड, जगन्नाथ फरांदे, श्रीराम वाघमारे, प्रवीण साले, अशोक जवादवार, रा.काँ.चे शिवाजी जाधव, वसंत सुगावे, निखील लातूरकर यांच्यासह पत्रकार संजीव कुलकर्णी, विनायक एकबोटे, विश्वनाथ देशमुख, कमलाकर जोशी आदीजणांची उपस्थिती होती. माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील, सुधाकर डोईफोडे, मोहन शिंदे, डॉ. दिपक शिंदे, अरुण कुलकर्णी, लक्ष्मीकांत तांबोळी, नरेंद्र मालिवाल यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले.