सोलापूर :
सामान्यांचे प्रश्न मांडणारी संस्था म्हणून पत्रकारिता असली पाहिजे. या
संस्थेचा विस्तार होत असताना पत्रकारांनी भविष्याचा वेध घेऊन लेखणी चालवली
पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, पालकमंत्री दिलीप सोपल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार पद्मसिंह पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, महापौर अलका राठोड, आमदार सर्वश्री भारत भालके, दिपक साळुंके पाटील, सिद्रामप्पा पाटील, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पत्रकारांनी वाईट बाबींवर प्रहार करायलाच हवा, मात्र त्याचबरोबर एखाद्याला नाउमेद न करता उत्साह वाढविण्याचे काम पत्रकारितेने केले पाहिजे. पवार यांनी यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी सुशिलकुमार शिंदे म्हणाले, पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम करतात. नविन चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकाराने प्रयत्न करावे. तसेच चांगला पत्रकार होण्यासाठी चिंतन, मनन, विश्लेषण त्याचबरोबर संशोधन आदी गुण आवश्यक आहेत. याच गुणांनी त्या पत्रकाराला व पत्रकारितेला वैभव प्राप्त होते. पित पत्रकारितेला थारा नको.
पालकमंत्री सोपल म्हणाले, पत्रकारांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे, वाचनाची आवड जोपासावी. त्याच बरोबर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा. तसेच सोलापूर जिल्ह्याची पत्रकारितेची वैभवशाली परंपरा वृध्दिंगत करावी.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार शहाजहान अत्तार व प्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार तसेच 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीस मान्यवरांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनिष केत यांनी केले. नितीन पात्रे यांनी आभार केले.
याप्रसंगी माजी मंत्री आनंदराव देवकते, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, निर्मलाताई ठोकळ, उपमहापौर हारुण सय्यद, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, महेश गादेकर, मनोहर डोंगरे, राजा सरवदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजा माने, विभागीय अध्यक्ष राकेश टोळ्ये, माजी अध्यक्ष गणेश जोशी, मुद्रित-इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.