मुंबई : उस्मानाबाद शहर पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सात कोटी रूपये मंजूर केल्याची घोषणा केली.
        उस्मानाबाद दौऱ्यावर आलेले चव्हाण यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे जिल्ह्याच्या विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी पाणी पुरवठा योजनेच्या थकीत देयकांचा विषय चर्चेला आला. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने सात कोटी रूपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.
 
Top