कळंब -: शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे कळंब (जि. उस्मानाबाद) येथे आगमन झाले असून याप्रसंगी भक्तांनी पुष्पवृष्ठी करून पालखीचे शहरात उत्साहात स्वागत केले. पालखी समवेत सहाशे वारकरी सहभागी झाले आहेत. कळंबमध्ये पालखी येण्याचे यंदाचे ४६ वे वर्ष आहे.
पंढरीच्या विठ्ठूरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील दिंड्या
पंढरपूरकडे प्रस्थान करीत असून. यामध्ये शेगाव येथून निघणार्या गजानन महाराजांच्या पालखीचे समवोश आहे. १५ जूनपासून शेगाव येथून महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. ३३ दिवसांचा पायी प्रवास करून १८ जुलै रोजी पंढरपूर येथील विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. दरवर्षीप्रमाणे २१ व्या दिवशी या पालखीचा मुक्काम कळंब येथे असतो. त्यानुसार शनिवारी ही पालखी सायंकाळी ५ वाजता शहरात दाखल झाली. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू असतानाही मोठय़ा संख्येने भाविक पालखीसाठी व श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी उभे होते. मांजरा नदीवरून आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम नगराध्यक्ष शिवाजी कापसे, बांधकाम सभापती अतुल कवडे, नगरसेवक सुनील गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र मुंडे, भागवत धस, अनंत वाघमारे, राष्ट्रवादीचे गटनेते र्शीधर भवर, पोलिस उपनिरीक्षक एम. एन. शेळके आदींनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पालखी विसावली आहे. येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. हजारो भाविक रांग लावून पालखीचे दर्शन घेत आहेत. पंढरीच्या विठ्ठूरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील दिंड्या