बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) –: राज्यभर व्यक्तींच्या स्मरणशक्तीची वाढ करण्याचे ठोकताळे सांगून विविध विषयांवर व समस्येंवर उत्तरे काढण्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. मानवी मनांच्या शक्तीद्वारेच मानवावर विविध प्रकारचे परिणाम होत असल्याचे मेमरीमॅन सलमान आर्मेचरवाला यांनी सांगितले.
    बार्शी येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात विदयार्थी व पालकांना प्रात्यक्षिके दाखविल्यानंतर बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती सांगितली. चार वर्षापासून त्यांनी केलेल्या स्मरणशक्ती वृध्दीच्या अभ्यासातून त्यांनी अनेक गोष्टी स्वत: आत्मसात केल्या व त्या इतरांना देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. एकदाच वाचून अथवा ऐकून गोष्टी लक्षात ठेवता येतात. याच्या अनेक पध्दती असून त्यापैकी फोटोग्राफी मेमरी पध्दत ही सोपी आहे. याच्या तंत्राचा कोर्सद्वारे अभ्यास केल्यानंतर स्वत:ची पध्दती विकसित करुन आणखी सोप्या पध्दतीने ही शिक्षण देता व घेता येते. विश्वरुपराय चौधरी हे गुरुस्थानी व मुख्य प्रेरणास्त्रोत असल्याने सांगत आपण अध्ययत पध्दतीत बदल करुन केलेल्या विकसित ज्ञानाची दखल अनेक माध्यमांनी घेतली आहे. बहुतांश जिल्हयात आपले प्रयोग झाले असून अनेक शाळांतील विदयार्थी व शिक्षकांसाठी स्वतंत्र कार्यशाळाही झाल्याही आहेत. सदरच्या पध्दती शिकण्यासाठी वयाची मर्यादा नाही. भाषण करणा-या व्यक्तीकडून येणा-या शब्दातील 700 ते 900 चित्रे मेंदूत निर्माण होत असतील तर ते भाषण आवडणारे असते. तर 400 पेक्षा कमी चित्रांचे रटाळवाणे होते. चित्रफेक करण्याचे कौशल्य असल्यास समारेच्या श्रोत्याच्या मनात तंतोतंत चित्र निर्माण होते. मानवाच्या मेंदूतील उजवा आणि डावा असे दोन भाग असून उजव्या मेंदूचा वापर करुन जगातील 5 टक्के लोक खूप मोठी कामे करतात. यात उदाहरणे दयावयाची झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद स्वामी इत्यादी होत. यांची कल्पनाशक्ती फार चांगली असते. दररोज 15 ते 20 मिनिटे स्वत:साठी दिल्यास जीवनात यशस्वी होता येते. 24 तासातील 15 मिनिटे विशिष्ट ध्यान, धारण यांद्वारे यशस्वी होता येते. यशस्वी होण्यासाठी समाधानी, नियमित आनंदी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या हिप्नोटाईज बाबत खूप गैरसमज पसरले आहेत.
    सलमान आर्मेचरवाला यांनी हिप्नॉटिझम (संमोहन), रिमोट कंट्रोल विमान, स्मरणशक्ती वाढवून कमी वेळात जास्त अभ्यास करण्याचे तंत्र, एरोबेटीक, एरियल फोटोग्राफी इत्यादींतून आजपर्यंत नाव केले आहे. पान क्रमांकासह पुस्तक लक्षात ठेवणे, एकदा वाचून सरळ व उलट क्रमाणे अंक लक्षात ठेवणे, चारशे वर्षांचे कॅलेंडर लक्षात ठेवणे, मुददेनिहाय उत्तरे लक्षात ठेवणे, कॉपी तंत्र, नवीन भाषा शिकण्याचे तंत्र, भाषण, लेक्चर, ऐतिहासिक तारखा, वाढदिवस लक्षात ठेवणे, मंत्री व त्यांची खाते, फोन, मोबाईल, अकाऊंट नंबर, वाहन क्रमांक, व्यक्तींची नावे लक्षात ठेवणे याची सोपी पध्दत शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
 
Top