मुरुम -: दीड महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 6 जुलै रोजी मुरुमजवळील रामनगर तांड्यावर (ता. उमरगा) सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सासरच्यांवर घातपाताचा आरोप करीत माहेरच्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिस बंदोबस्तात व्हीडीओ चित्रिकरण करून शवविच्छेदन आणि अंत्यविधी करण्यात आला.
रामनगर (बेळंब तांडा) येथील संगीता महेश राठोड (20) या नवविवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सासरचे नातेवाईक फुलचंद लिंबा राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून मुरुम पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. संगीता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर घातपाताचा आरोप करीत व्हीडीओ चित्रिकरण करून शवविच्छेदन करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे तांड्यावर सकाळपासून तणावाचे वातावरण होते. पोलिस निरीक्षक आनंद निंगदळे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस बंदोबस्त वाढवला.
शवविच्छेदन करण्यासाठी आलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह सकाळी 10 वाजता आणला. मात्र, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रजा न देता शुक्रवारी नांदेडला गेल्याने शवविच्छेदनविना मृतदेह दोन तास केंद्रात ठेवण्यात आला. पोलिसांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून नाईचाकूर येथील डॉ. बी. एच. चाकूरकर तसेच आष्टाकासार येथील डॉ. वैशाली चाकोते यांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचे चित्रिकरण करण्यात आले. तसेच तांड्यावर चित्रिकरण करून अत्यंविधी करण्यात आला. संगीता यांचा विवाह महेश याच्यासोबत दि. 20 मे रोजी झाला होता. तेव्हापासून माहेरहून पैसे व शिलाई यंत्र आणावे म्हणून संगीताचा सासरी छळ करण्यात येत होता, असा आरोप संगीता यांचे चुलते फुलचंद जाधव यांच्यासह नातेवाईकांकडून करण्यात आला. यामुळे हे प्रकरण हत्या आहे की, अपघात याचा तपास पोलिस करीत आहेत. सध्या मात्र याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद करण्यात आली आहे.