नळदुर्ग -: येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयात नव्याने बांधण्यात आलेल्या विदयार्थिनी वसतीगृहाचा उदघाटन सोहळा सोमवार दि. 8 जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजता पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होत आहे.
    विदयापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली अकराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयात विदयार्थिनी वसतीगृह बांधण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पालकमंत्री तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी हे राहणार आहेत. तर संस्थेचे सचिव तथा माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, सहसचिव प्रभाकरराव नळदुर्गकर, कोषाध्यक्ष बाबुराव सुरवसे आदींसह संस्थेचे संचालक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य एस.डी. पेशवे यांनी केले आहे.
 
Top