बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील बार असोसिएशच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. प्रवीण करंजकर विरुध्द ॲङ मोहन जाधव यांच्यात झालेल्या निवडणुकीत नऊ मतांनी करंजकर यांचा विजय झाला. उपाध्यक्ष पदासाठी ॲड. जगताप यांना 39 मते जास्त मिळाली. खजिनदार पदासाठी झालेल्या निवडणुकत धनंजय धस यांना एक मतांचे मताधिक्य मिळाले. सेक्रेटरपदी ॲङ निलकंठ कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली तर लायब्ररीच्या चेअरमनपदी अविनाश गायकवाड यांची सलग तिस-यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून ॲङ जे.बी. कोरके-पाटील यांनी काम पाहिले.