बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पानगाव (ता. बार्शी) येथील संत बाळू मामा देवस्थान येथे सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे यांनी दिली. डोळयांच्या विकारासाठी मोतीबिंदू लेन्ससह मोफत ऑपरेशनकरीता देवस्थानचे विश्वस्त कापसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून विविध रोगांची चिकित्सा व तपासणी या शिबीरात होणार असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक जयगुरु स्वामी यांनी केले आहे.