बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) –: नागोबाचीवाडी (ता. बार्शी) येथे एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडया झाल्या असून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. याबाबत बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री दोनच्या नंतर बापू गायकवाड हे कुटुंबासमवेत झोपले असताना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे समजले. घरातील कपाटाची चावी घेऊन चोरटयांनी पाच तोळे सोन्याचे गंठण, माळ इत्यादीसह रोख 71 हजार रुपये लंपास केले. याप्रमाणेच बापू गायकवाड, वामन बारंगुळे, इस्माईल काझी, संजय बारंगुळे यांच्याही घरात मध्यरात्री चोरी झाल्याचे उघड झाले आहे. यांच्या घरातील मौल्यवान वस्तू व शेळया चोरटयांनी नेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याप्रकरणी बापू गायकवाड, वामन बारंगुळे, इस्माईल काझी, संजय बारंगुळे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पहाटे पाच वाजता घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. एकाच रात्री पाच घरफोडया झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेखा धस व विश्वास शिनगारे हे करीत आहेत.