बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: परंपरेनुसार आषाढी एकादशीनिमित्त् श्री भगवंत उत्सव मूर्तीची रथयात्रा मोठी उत्साहात पार पडली. ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन रथयात्रा जात असताना हजारो भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी खारीक, खोबरे, फुले इत्यांदीची उधळण केली.
सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु असल्याने भगवंत मंदिरात अनेक भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे तीन वाजता काकडा आरतीचा नित्योपचार झाल्यानंतर अभिषेक करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गरुडावर आरुढ झालेल्या श्री भगवंतांच्या उत्सव मुर्तीची सवादय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बडवे मंडळी परंपरागत पोशाख परिधान करुन उपस्थित होते.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान तहसिलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दादा बुडुख, मिठू सोमाणी यांच्यासह पंच उपस्थित होते. भर पावसातही अतुल अन्नदाते, सुभाष भोसले, अनिरुध्द कुलकर्णी, पवन वाघोलीकर, राहुल वाघमारे, साईनाथ उपरे, दत्ता चितारे, सागर उपरे, नंदकुमार माळवदे, परसु मोरे, लक्ष्मण गरड या सर्वांनी रथाची फुलांनी सजावट केली.
रथयात्रा महाद्वार चौक, पटेल चौक, तुळशीराम चौक, दाणे गल्ली, पान खुट, किराणा रोड, पांडे चौक मार्गे श्रीराम मंदिर येथे आल्यानंतर रथयात्रेचा समारोप करण्यात आला.