सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाच्या कामाबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दिलीपराव माने यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सर्वश्री आनंदराव देवकते, सिध्दराम म्हेत्रे, महापौर श्रीमती अलका राठोड, आ. दिलीपराव माने, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोलापूर मनपाबाबतच्या समस्येबाबत आयुक्त व महापौर यांच्याकडून माहिती घेतली. प्रामुख्याने एलबीटी बाबत माहिती घेतली. तसेच घरकुलांच्या समस्येबाबत केंद्र शासनाच्या योजना राबविता मनपाच्या निधीचा वाटा भरण्यासाठी मनपास उत्पन्नाअभावी अडचणी बाबत चर्चा झाली.
जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळवकठे येथील विद्यार्थ्यांना लोहयुक्त गोळ्या खाल्ल्याने मुलांना पोटदुखी, उलट्या, जुलाब झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन संबंधितांकडून माहिती घेतली. कशामुळे हा प्रकार झाला याबाबत शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता व आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. सदरच्या गोळ्या तपासणीसाठी शासकीय लॅबकडे पाठविण्या आल्या असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात आत्तापर्यंत पडलेल्या पावसाचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. प्रत्येक सर्कल ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यानुसार प्रत्येक तालुक्याची पावसाची सरासरी काढण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावर्षीचा पाऊस सांगोला, मंगळवेढा तालुका वगळता समाधानकारक झाला आहे. खरीपाची पेरणीही नेहमीपेक्षा जास्त झाली आहे. 91 हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 1 लाख 24 हजार क्षेत्रावर (ऊसाशिवाय) 137 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिलह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर साखळी पध्दतीचे सिमेंट बंधारे करण्यात आले त्याची सद्यस्थिती काय आहे त्यामध्ये किती पाणी आले आहे याबाबतची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निधीतून जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या 8 कोटी रुपयातील काय कामे झाली याबाबतची माहिती घेतली.