बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी नगरपरिषदेच्यावतीने एक लक्ष वृक्ष लागवडी उपक्रमांतर्गत औदयोगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या हस्ते रोपांच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. सोमवार दि. 22 रोजी नगरपालिकेच्या स्व. जगदाळे मामा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
    यावेळी रवि फौंडेशनचे संस्थापक मधुकर डोईफोडे, बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्यक्ष राहुल कोंडारे, मुख्याध्याधिकारी लांघी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी बापू मांगडे, राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेवक देविदास शेटे, संदिप बारंगुळे, दगडू मांगडे, बाबुराव जाधव, ज्योतिर्लिंग कसबे, रमेश पाटील, माजी नगरसेवक अब्बासभाई शेख, आबा पवार, भगवान माने, बिटकू फुरडे, नगरसेविका मंगलताई शेळवणे, संगिता मेनकुदळे, रिझवाना शेख, जयश्री खोगरे, अरुणा परांजपे, शरद कुलकर्णी, आरोग्याधिकारी विजय गोदापुरे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना मधुकर डोईफोडे यांनी दुष्काळदृश्य परिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष असतांनाही नगरपालिकेच्या माध्यमातून फॉरेस्टमधील जोपासलेल्या वृक्षांना पाण्याची उपलब्धता करुन दिली. त्यामुळेच आपल्या रवि फौंडेशन या संस्थेच्यावतीने झाडांना संजीवनी देवू शकलो. रवि फौंडेशन आणि देशमाने यांच्या खर्चातून आपली संस्था वृक्षांना जगविण्याचे काम करत असून आज तयार झालेले पावसाचे वातावरण हे त्यामुळेच आहे. ना. दिलीप सोपल यांनी बार्शी शहराच्या  घराघरात उजनीचे पाणी पोहोचवले असून त्यांना मंत्रिपद मिळाल्याने कॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुका आणि जिल्हयाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. त्यांच्या सारख्या कर्तृत्वान व्यक्तीस वनमंत्री केले तर संपूर्ण राज्याचे चित्र बदलेल. सर्वत्र सुजलाम सुफलाम वातावरण तयार होण्यास मदत होईल व भवियात येणा-या दुष्काळावर मात करणे सोपे होईल. आपल्या क्लासच्या विदयार्थ्यांनी यापूर्वीही मनापासून वृक्ष जगविले आहेत. आंघोळ केलेले पाणी देखील वाया जाऊ न देता ते झाडांना देणे, वेळोवेळी त्याची काळजी घेणे हे विदयार्थ्यानी मनापासून केले आहे. मागच्या वर्षी विदयार्थ्यांनी 30 हजार वृक्ष जोपासले आहेत. तालुक्यासाठी सुरु असलेल्या उपसा सिंचनच्या कॅनलच्या दुतर्फा जंगली वृक्षांची रोपे लावल्यास भविष्यात चांगले वृक्ष निर्माण होतील. नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या संस्थेला वृक्षासंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी मदत झाली असल्यानेच फॉरेस्टमधील चांगले दृश्य पाहावयाला मिळत आहे.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश अक्कलकोटे यांनी केले. रमेश यांनी प्रास्ताविक केले. तर आभार नगरसेविका सौ. परांजपे यांनी मानले.
 
Top