सोलापूर :- उत्तराखंड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या सहाय्यासाठी पाठविलेल्या पथकामध्ये उत्कृष्ट पध्दतीने कामकाज केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांचा सन्मान करण्यात आला.
नाटेकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन कार्य मंत्री पतंगराव कदम आणि राज्यमंत्री सुरेश धस तसेच मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांचे उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी पाठविल्यामूळेमहाराष्ट्रातील यात्रेकरुना परत सुखरुप पाइविणेमध्ये अमृत नाटेकर यांना कामकाज करता आले.
अमृत नाटेकर यांनी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेमधील बहुतांशी सर्व किल्ले पदभ्रमण केलेले आहेत. तसेचदरवर्षी हिमालायातील पर्वतरांगेतही गिर्यारोहणासाठी जात असतात.सन 2010 मध्ये नेपाळ मधील 18500 फुटापर्यंत एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प, सन 2012 मध्ये उत्तराखंड येथे 14500 फुटापर्यंत हरकीधुन ट्रे तसेच सन 2013 मध्ये दार्जिलिंग येथील हिमालयीन माऊंटनरिंग इन्स्टिटयूट या संस्थेत प्रशिक्षण पूर्ण करुन 18500 फुटावरील बीसी रॉय पीक यशस्विरित्या सर केलेले आहे.