उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे हस्ते मेंढा व पाडोळी येथे दलितवस्ती सुधार योजनेअतर्गत समाज मंदिराचे भुमीपुजन संपन्न झाले. याप्रसंगी त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, संजय गांधी निराधार योजनेचे  तालुका अध्यक्ष लक्ष्मण सरडे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, जि. प. सदस्य सुधाकर गुंड, रुपामाता मल्टीस्टेटचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड, पं. स. सदस्य दत्तात्रय सोनटक्के, नायब तहसीदार प्रभू जाधव उपस्थित होते.
    प्रथम मेंढा येथे श्री. चव्हाण यांच्या  हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यानंतर दलित वस्ती सुधार  योजने अंतर्गत मेंढा येथील समाज मंदिराचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, या भागाचा विकास करतांना प्रत्येक योजना जनतेच्या हिताकरिता राबविण्यात  आल्या. यामध्ये काही राहिले असले ते सुध्दा पुर्ण करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल. या भागातील शेतक-यांसाठी रब्बी पिकाकरिता उपलब्ध झालेला निधी तात्काळ संबधीतांना देण्याचे निर्देश दिले आहेत. येथील महादेव मंदिर व निजामुद्दीन पिरसाब या ठिकाणी बांधकामास मदत करु, असे त्यांनी सांगितले.
     पाडोळी येथे दलित वस्ती योजनेअंतर्गत समाज मंदिराचे भुमीपुजन व 13 व्या वित्त आयोग जि.प. अंतर्गत सिमेंट  रस्त्याचे लोकार्पण श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडीबाबत आवाहन करुन त्याचा लाभ घेण्याचे नागरीकांना आवाहन केले.
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोतीलाल कोचेटा व धनंजय गुंड यांनी केले. या प्रसंगी गावचे सरपंच,ग्रामसेवक तसेच परिसरातील गावातील सरपंच व पदाधिकारीही  मोठया संख्येने उपस्थित होते.       
 
Top