उस्मानाबाद :- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्यावतीने अनुदानीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीसाठी रुपये 1 लाख 79 हजार 976 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. के .एम. नागरगोजे यांच्याकडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी .एस. गायकवाड यांनी सुपूर्द केला. यावेळी कार्यालयातील इंद्रजीत पिसे, चंद्रकांत भगत, व्यंकट काळे, जितेंद्र सोमवंशी, सुमंत जाधव आदि उपस्थित होते.