सोलापूर -: सोलापूर शहर आणि जिल्हा गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने ओलाचिंब झाला आहे. पुष्य नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
       जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरुच आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आहे. करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, माढा, मंगळवेढा, मोहोळ, बाश्री, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या सर्वच तालुक्यांमध्ये दिवसभर पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
       सोलापूर शहरातही दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले होते. काही परिसरात पाणी साचून मोठय़ा प्रमाणावर तळे निर्माण झाले होते. तर झोपडपट्टी भागामध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणावर पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामधून वाहने बाहेर काढताना नागरिकांना भलतीच दमछाक करावी लागली. एकूणच सोलापूर शहर आणि परिसरात दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
 
Top