बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील आर.एस.एम. संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या जलसंधारण पॅटर्नची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने घेतली असून सोमवारी दि. 29 रोजी होणा-या कृषी परिषदेकरीता राजेंद्र मिरगणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
    शासनाच्या इंडियन काऊन्सली ऑफ ॲग्रोकल्चर रिसर्च (भारतीय कृषी अनुसंधान परिषद), आय.सी.ए.आर. नवी दिल्लीच्यावतीने अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ येथे दान दिवस कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शंभराहून अधिक कृषी संशोधन या परिषदेत उपस्थित राहणार असून शास्त्रशुध्द जलसंधारण पॅटर्न राबविल्याबददल तसेच देशाच्या विकासाला उपयुक्त असल्याने राजेंद्र मिरगणे यांचा बहुमान केला जात आहे. या परिषदेमध्ये जलसंधारण पॅटर्नची तंत्रशुध्द माहिती व त्याचे परिणाम याचे विश्लेषण स्वत: राजेंद्र मिरगणे हे करणार आहेत. राज्यातील विविध भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळया प्रकारचे पॅटर्न उपयुक्त ठरत असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन सर्व त्रुटी दुरुस्त करत नवीन पॅटर्न तयार करण्यात आला. सदरचा पॅटर्न हा अत्यंत उपयुक्त ठरला असून हा कोणत्याही भौगोलिक परिस्थितीमध्ये राबविता येतो.
    राज्यातील अनेक जलसंधारण पॅटर्न जवळील बंधा-याजवळ शेतक-यांची जमीनी वाहून जात असल्याने अनेक बंधारे फोडले गेले. सदरच्या बाबीसाठी शासनाचे हजारो कोटी रुपये वाया गेल्याने यातील त्रुटी शोधून त्यावर चांगल्या प्रकारची कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी या पॅटर्नची निर्मिती करण्यात आली. सदरच्या पॅटर्नमधील उतार, जमीनीतील घेण्यात आलेल्या बोअर तसेच जमीनीच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास, बंधा-याजवळील काळया मातीभोवती लावण्यात येणारे दगड इत्यादी सुधारणा करण्यात आल्या आहेत.
 
Top