अकलूज -: श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणा-या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यावर्षी 18 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूर येथे दाखल होत आहे. या सोहळयात चार गोल व तीन उभे असे एकूण सात रिंगण सोहळे असून यावर्षी फलटण येथे दोन दिवस पालखी मुक्काम राहणार आहे.
मंगळवार दि. 2 जुलै रोजी पुणे येथे दिवसभर मुक्काम, बुधवार 3 जुलै रोजी पुणे येथून हडपसर, उरळी देवाची, झेंडेवाडी, सासवड येथे मुक्काम, गुरुवार 4 रोजी दिवसभर सासवड येथे मुककाम, शुक्रवार 5 रोजी सासवड येथून बोरावके मळा, यमाई शिवारी, साकुर्डे, जेजुरी मुक्काम, शनिवार 6 रोजी जेजुरी येथून दौंडज शिव, वाल्हे मुक्काम, रविवार 7 रोजी वाल्हे येथून पिंपरे, नीरा, श्री नीरास्नान, लोणंद मुक्काम, सोमवार दि. 8 जुलै रोजी संपूर्ण दिवस लोणंद येथे मुक्काम, मंगळवार 9 रोजी लोणंद येथून चांदोबाचा लिंब, तरडगाव येथे मुक्काम, बुधवार 10 रोजी तरडगाव येथून दत्त मंदिर सुरवडी, निंभोरे ओढा, वडजळ, विमानतळ फलटण येथे मुक्काम. गुरुवार 11 रोजी फलटण येथे दिवसभर मुक्काम, शुक्रवार 12 रोजी फलटण, पिंपरद, साधूबुवाचा ओढा, धर्मपुरी, शिंगणापूर फाटा, पानसकर वाडी, नातेपुते येथे मुक्काम.
रविवार 14 रोजी नातेपुते येथून मांडवे ओढा, सदाशिवनगर, वेळीव, माळशिरस येथे मुक्काम, सोमवार 15 रोजी माळशिरस येथून खुडूस फाटा, विझोरी, धावाबावी माऊंट, वेळापूर मुक्काम, मंगळवार 16 रोजी वेळापूर येथून ठाकूरबुवाची समाधी, तोंडले-बोंडले, टप्पा, भंडीशेगाव येथे मुक्काम, बुधवार 17 रोजी भंडीशेगाव येथून बाजीरावची विहीर, वाखरी मुक्काम, गुरुवार 18 रोजी वाखरी येथून पंढरपूर येथे मुक्काम होणार आहे.
शुक्रवार दि. 19 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने "श्री" चे चंद्रभागेत स्नान, शनिवार 20 रोजी प्रदशिक्षणा व रविवार दि. 21 रोजी पंढरपूर येथे मुक्काम, सोमवार 22 रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. पांडुरंगाच्या ओढीने वारकरी निघाले आहेत.

यावर्षी पालखी सोहळयात...
* चार गोल रिंगण : दि. 14 जुलै रोजी सदाशिवनगर, दि. 15 रोजी खुडूस फाटा, दि 16 रोजी ठाकूरबुवांची समाधी, दि. 17 रोजी बाजीरावची विहीर.
* तीन उभे रिंगण : दि. 9 जुलै रोजी चांदोबाचा लिंब, दि. 17 रोजी बाजीरावची विहीर, दि. 18 रोजी वाखरी.
* दोन दिवसांचे मुक्काम : दि. 1 व 2 जुलै रोजी भवानीपेठ पुणे, दि. 3 व 4 रोजी सासवड, दि. 7 व 8 रोजी लोणंद, दि. 10 व 11 रोजी पालटण.
* दि. 13 रोजी धर्मपुरी येथे दुपारी पालखीचा सोलापूर जिल्हयात प्रवेश
साभार : दै.पुढारी