नळदुर्ग -: भरधाव वेगात येणा-या ट्रकने शाळकरी मुलास चिरडल्याने त्यात त्या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी श्री तुळजाभवानी साखर कारखान्याजवळ घडली.
दीपक उत्तम राठोड (वय 10 वर्षे, रा. वसंतनगर, नळदुर्ग) हा तुळजाभवानी साखर कारखाना येथील शाळेत इयत्ता चौथीचा वर्गात शिकत होता. सकाळी तो शाळेकडे जता असताना तुळजापूरहून नळदुर्गकडे भरधाव येणारा मालट्रक (क्रं. आर.जे. 19 जी.सी. 4152) याच्या चालकाने दीपक राठोड यास जोराची धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी होवून जागीच मरण पावला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.