नळदुर्ग -: येथील राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विदयालयामध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी विदयालयाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून स्त्रीभ्रुण हत्या, शेतकरी आत्महत्या या विषयावर विदयार्थ्यांनी पथनाटय सादर केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विजय यादगिरे, माजी नगरसेवक अनिल हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य एल.एस. ताडकर, राजेंद्र राठोड, यासह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी वर्षा स्वामी यांनी केले तर आभार अनिल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता संदीप जाधव, सचिन माने, राघवेंद्र मदीकेरी, विजय राठोड, रविंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
 
Top