सोलापूर -: गुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादनाने जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
रंगभवन येथील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे आयोजित कामधेनु दत्तक ग्राम योजनेच्या कार्यशाळा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी आमदार राजन पाटील, कृषी सभापती जालिंदर लांडे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, महिला व बाल कल्याण सभापती जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. जी. मोरे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. के. राठोड उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेने सन 2011-12 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीद्वारे प्राप्त निधीचा विनियोग करुन पशुपालकांसाठी अतिशय चांगली योजना राबविली आहे. अशा प्रकारच्या योजना राबवित असतांना प्रशिक्षणापेक्षा प्रात्याक्षिकांवर अधिक भर देण्याची गरज आहे. देशात पशुपालन व दुग्धोत्पादन क्षेत्रात झालेले अभिनव प्रयोग जिल्ह्यातील शेतक-यांना दाखवून तशा प्रकारचे अनुकरण आपल्या पशुपालनात करण्याची आवश्यकता आहे. योजनेच्या यशस्वीतेसाठी या क्षेत्रात आवड असलेल्या पशुपालकांचीच आणि दुध डेअरीचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा असणा-या गावांची निवड करणे गरजेचे आहे. जगाच्या बाजारात उत्कृष्ट दुधाचे निकष पूर्ण करणारी गुणवत्ता पशुपालकांनी इथल्या दुग्धोत्पादनात वाढवून महाराष्ट्राचा नावलौकीक संपूर्ण जगात करावा असेही ते म्हणाले.
या पशुधनाची काळजी घेण्यासाठी नवीन पशुधन उपकेंद्रे बांधण्यापेक्षा आहे त्या पशुधन उपकेंद्रांची झालेली पडझड दुरुस्तीवर भर देण्यात यावा. तसेच उत्तम पशुवैद्यकांकडुन जनावरांची तपासणी करुन औषधावरील खर्च कमी करित उत्पादन वाढीवर भर द्यावा. याच बरोबर केवळ दुधाळ जनावरेच नव्हे तर त्यांच्या वासरांकडेही तितकेच लक्ष द्यावे असेही शेवटी त्यांनी सांगितले.
डॉ. माळी यावेळी म्हणाल्या की, कामधेनु दत्तक ग्राम योजनेमुळे जिल्ह्यातील पशुधन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणार असून दुग्धोत्पादनात यामुळे मदत होणार आहे. दुष्काळातही मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांनी दुग्धोत्पादनात अग्रेसर राहुन दुष्काळाशी मुकाबला केला आहे. या योजने अंतर्गत पशुपालनासाठी देण्यात येणा-या सर्व योग्य सूचनांची अंमलबजावणी करुन दुधाळ जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार श्री. पाटील यांनी स्व. यशवंतराव चव्हाणांचे जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागात चांगले काम करण्याचे स्वप्न सोलापूर जिल्हा परिषद प्रत्यक्षात आणत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी कामधेनु दिनदर्शिका आणि पुस्तकाचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. राठोड यांनी योजनेची माहिती देऊन कार्यशाळा आयोजना मागची भूमिका विषद केली.
कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्य, पशुधन पालक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.