उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर,2013 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच विभाजनामुळे व नव्याने निर्माण झालेल्या  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणूकांसाठी 1 ते 3 टप्प्यातील मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम घोषित केला होता.
      मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दि. 1 ऑगस्ट व प्रारुप मतदार यादी लोकांच्या परिक्षणासाठी उपलब्ध करणे आणि हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक 19 ऑगस्ट, हरकती व सुचना दाखल करण्याचा अंतिम दि. 23 ऑगस्ट असा होता. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 3 चे पोटनियम (5) नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करणे व अंतिम यादी प्रसिध्द करण्याचा  दि. 30 ऑगस्ट, 2013 असा आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top