उस्मानाबाद :- राज्यात शेतकरी ते ग्राहक या तत्वावर शासनाने थेट शेतीमाल विक्री योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्हयात प्रत्येक तालुक्यात थेट शेतीमाल विक्री केंद्र सुरु करण्याबाबत दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रकल्प संचालक (आत्मा) व्ही.डी. लोखंडे,उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, जिल्हा उपनिबंधक बडे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) एस.आर. चोले व सर्व तालुका कृषी अधिकारी, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदरील बैठकीत थेट शेतीमाल विक्री अंतर्गत भुम व उस्मानाबाद येथे भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रमाणेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक केंद्र सुरु करुन जनतेला योग्य त्या भावात शेतीमाल उपलब्ध करुन द्यावा अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना याप्रसंगी गायकवाड यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पंचायत समिती परिसर, शासकीय कॉलनी आनंदनगर, पोलीस कॉलनी, आयुर्वेदीक महाविद्यालय, विद्यापीठ उपकेंद्र, व तालुका स्तरावर तहसिल कार्यालय किंवा पंचायत समिती परिसरात थेट शेतीमाल विक्री केंद्र सुरु करावीत असेही याप्रसंगी त्यांनी सांगीतले. भाजीपाला उत्पादक गटाची निर्मिती करुन त्यांना प्रत्येक केंद्र विभागुन देण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.