मुंबई -: मंत्रालयाच्या पुनर्निर्माणाच्या कामाची पाहणी आज बुधवार रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मंत्रालय पुनर्निर्माणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनीमंत्रालयाच्या सात, सहा, पाच आणि चौथ्या मजल्यांवर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
मंत्रालयाचे पुनर्निर्माणाचे काम वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देऊन येत्या 15 दिवसात पुन्हा एकदा मंत्रालय मेकओव्हरच्या कामाची पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी सातव्या मजल्यावरील कामाची संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर सहाव्या मजल्यावर सुरू असलेल्या विविध दालनांच्या कामाची पाहणी करून या मजल्यावर सुरू असलेल्या कामाची संबंधितांकडून माहिती घेतली. चौथ्या, पाचव्या मजल्यांवरील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, सचिवांच्या दालनांची त्याचबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.
यावेळी मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित कुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस. के. मुखर्जी, वास्तुरेखाकार श्री. अडारी, युनिटी कन्स्ट्रक्शनचे श्री. अवर्सेकर, मुख्य अभियंता सी.पी. जोशी आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.