मुंबई :- एका इंग्रजी मासिकाच्या छायाचित्रकार तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना वरळीतील शक्ती मिलच्या आवारात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पीडितेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीसाठीची छायाचित्रे काढण्यासाठी 22 वर्षीय वृत्तछायाचित्रकार पुरुष सहका-यासोबत मिलच्या परिसरात गेली होती. तिच्या सहका-याला बांधून पाच नराधमांनी मिलमधील ओसाड जागी तिच्यावर अत्याचार केले. त्याच वेळी ना. म. जोशी मार्ग पोलिसांना घटनेची माहिती फोनद्वारे कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परंतु तोवर नराधम पसार झाले होते.