बार्शी -: प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्यावतीने आयोजित केलेल्या पंढरपूर ते विजयनगर आंतरिक शांती व सदभावना करीत एक ईश्वर एक विश्व परिवार यात्रा अभियान सुरु आहे. शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी बार्शीमध्ये संकल्पना रथासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राच्या संचालिका बी.के. संगीता बहन यांनी दिली आहे.
    शुक्रवार रोजी दुपारी साडे तीन वाजता कुर्डुवाडीहून येणा-या यात्रा अभियानाचे शिवाजी महाविदयालयाजवळ स्वागत करण्यात येईल. शोभायात्रेनंतर सायंकाळी पाच वाजता ब्रम्हकुमारी सेवाकेंद्र येथे शोभायात्रेचा समारोप होईल. शोभायात्रेनंतर शहरातील आंतरिक शांती व विश्व सदभावनेच्या दृष्टीने कार्य करीत असलेल्या सदभावक विभूतींचे स्नेहमिलन, यावेळी सुखमय जीवनाचा आधार सदभावना या विषयावर अमूल्य विचारांचे आदानप्रदान करण्यात येईल. सोलापूर उपक्षेत्राच्या संचालिका सोमप्रभाबहनजी यांच्या उपस्थितीत श्रीगुरु परंडकर महाराज, कविताबहन (भरतपूर) यांचे मार्गदर्शन होत आहे.
 
Top