बार्शी -: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शीच्यावतीने शाहीर अमर शेख यांच्या जयंतीनिमित्त मराठीतील उत्कृष्ट वाडमय:यासाठी शाहीर अमर शेख साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पा.न. निपाणीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
    या पुरस्कारासाठी काव्य सोडून कोणत्याही वाड:मय प्रकारातील साहित्यकृती पुस्तक पाठविण्यात यावे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रुपये दोन हजार असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
    जाग मराठा आम जमाना बदलेगा, असे टाहो फोडणा-या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन डफावर थाप देऊन तापत ठेवणा-या अमर शेख यांची बार्शी ही जन्मभूमी आहे. संपूर्ण बालपण बार्शीत व्यतीत केल्यानंतर त्यांनी आपल्या ओजस्वी पोवाडयातून हजारोंच्या जनसमुदायास मंत्रमुग्ध केले. अत्यंत नामवंत साहित्यिक व समीक्षकांनी शाहीर अमर शेख यांचे वाड:मय तसेच संयुक्त महाराष्ट्र डाव्या चळवळीतील भरीव योगदानाचे कौतुक केले. त्यांच्याच जन्मभूमीत शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार देण्यात येत असनू साहित्यिकांच्या लेखनीची पाती तेवत ठेवण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.
    जानेवारी 2012 ते डिसेंबर 2012 या कालावधीमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती दि. 21 सप्टेंबरपर्यंत प्रमुख कार्यवाह, शब्बीर मुलाणी, शमा मंझील, पवार प्लॉट, उपळाई रोड, बार्शी जि. सोलापूर या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन म.सा.प. यांच्यावतीने करण्यात आले आहे.   
 
Top