उस्मानाबाद :- जिल्हयात सोयाबिन- कापूस किड रोग व सल्ला प्रकल्प सन 2013-14 अंतर्गत केलेल्या निरिक्षणावरुन सध्या सोयाबिन पिकावर काही ठिकाणी उंट अळी, घाटे अळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा सेडोप्टेरा आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून कापूस पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीच्या नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे उपाय योजना कृषी कार्यालयाच्या वतीने सुचविण्यात आल्या आहेत.
        सोयाबिन पिकावरील उंट अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी व घाटे अळी च्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टोन बेन्झोएट 5 एस.जी. 0.4 ग्राम किंवा प्रोफेनोफॉस 50 ई. सी. 2.5 मिली प्रती लिटर पाण्यातुन फवारावे. चक्रीभुंग्याच्या व्यवस्थापनासाठी इथोफेनप्रोक्स 10 ई. सी. 5.2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या अंडी पुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. पाण्याचा निचरा करावा व पिक तणमुक्त ठेवावे.         तसेच कापूस पिकावरील रसशोषक किडीसाठी फिप्रोनिल 5 एस. सी. 2 मिली किंवा बुप्रोफेन्झीन 25 एस. सी. 1 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. इमीडाक्लोप्रोडची वारंवार फवारणी करु नये. तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या (सेडोप्टेरा) अंडी पुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. या किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी किटकनाशकाची मात्रा 3 पट करावी. असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी उस्मानाबाद व जिल्हा किड नियंत्रक यांनी केले आहे.
 
Top