मुंबई : इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला झालेल्या अटकेमुळे देशात यापूर्वी झालेल्या काही दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश तर होईलच शिवाय भविष्यातील त्यांच्या अशा कटांचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.
        यासीन भटकळचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता. महाराष्ट्र एटीएसने देखील त्याची आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांची माहिती देण्यासाठी गेल्या वर्षीच १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पुणे येथील जर्मन बेकरी आणि मुंबईतील झवेरी बाजार, दादर येथील बॉम्बस्फोटामागे भटकळचा हात असल्यामुळे आज त्याला झालेली अटक फार महत्वाची आहे. राज्यातील अशाच स्वरूपाच्या ८ गुन्ह्यांसाठी यासीन पोलिसांना हवा होता.
        सुरक्षा दलांमधील समन्वयामुळे मिळालेले हे यश असून लष्कर-ए- तोयबाचा प्रमुख दहशतवादी अब्दुल टुंडा याच्या आणि आता भटकळच्या अटकेने देशातील दहशतवाद्यांचे जाळे कमजोर होण्यास मदत होईल, असे आपल्याला वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
Top