नळदुर्ग -: समाजात द्वेष पसरविणारी विचारसरणी बंद पडली पाहिजे. ही शरीराची हत्या असून विचाराची हत्या नाही. स्वत:साठी काही न करणारा दुस-यांसाठी उभे आयुष्य वेचणा-या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे विचार पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांनी केले.
    अणदूर (ता. तुळजापूर) येथील हॅली मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या श्रध्दांजली सभेत डॉ. अहंकारी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अशोक अहंकारी, सुरेश कंदले, डॉ. अमर कंदले आदीजण उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी सरपंच प्रभोद कांबळे म्हणाले की, ही घटना अतिशय भ्याड व निंदणीय असून जादूटोणा विरोधी विधेयक पास करणे, हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल. यावेळी सुरेश कंदले, अशोक अहंकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हॅलो नर्सिंग स्कूलची विदयार्थिनी कु. शितल गायकवाड हिने लेखलन वाचन केले. याप्रसंगी डॉ. आनंद अहंकारी, प्रसन्न कंदले, जावेद शेख, मधुकर कुलकर्णी, धर्मा संकनवूर, सागर निकंबे, गंगोधरी कबाडे, कविता राठोड, छबु माने, संध्या रणखांब, नर्सिंग स्कूलचे प्राचार्य हुमायुन टक्केड, साहेब गौडा, संजय नरोडे आदीजण उपस्थित होते.
 
Top