बार्शी -: बार्शीत नुकतीच अ.भा. मराठा महासंघाच्या सात शाखांची स्थापना करण्यात आली. दरम्यान, याच निमित्ताने येथील संभाजी राऊत यांची बार्शी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा सचिव संदीप मोरे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
    बार्शी शहरातील हायवे स्टॉप, शिवाजी नगर, अलिपूर रोड, बेदराई गल्ली, नरवीर तानाजी चौक, स्टॅण्ड चौक व तुळजापूर रोड येथे शाखांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माढा तालुकाध्यक्ष रणजित घोडसे, बार्शी तालुकाध्यक्ष सुरज गव्हाणे, नगरसेवक दिपक राऊत, माजी नगरसेवक विनोद वाणी, छावा संघटनेचे अध्यक्ष सागर मगर, तालुका युवक अध्यक्ष ॲड. श्रीकांत सुरवसे, अतुल कानकोत्रे, रितेश वाघमारे, उमेश काळे, इरफान शेख, समीर तांबोळी, सचिन पवार आदी उपस्थित होते.
    यावेळी जिल्हा सचिव संदीप मोरे बोलताना म्हणाले, मराठा महासंघ हा सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन काम करणारा संघ आहे. शाखेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्याबरोबर, मराठा महासंघाचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे.
 छत्रपती ग्रुप तसेच मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संदीप मिरगणे यांनी केले.
 
Top