सोलापूर :– जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयामार्फत बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिनांक 29 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 10 वाजता बाळी मंगल कार्यालय, कन्ना चौक, सोलापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
     इयत्ता 4 थी ते एस.एस.सी / एच.एस.सी / एच.एस.सी - एमसीव्हीसी/ बी.एस.सी/ बी.एस.सी – केमिस्ट्री / आयटीआय - टर्नर / फिटर / इलेक्ट्रीक / वेल्डर / ग्राईंडर / मशीनीस्ट / शीटमेटल / वेल्डर इ. शैक्षणीक पात्रतेचे आणी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे वयाचे उमेदवार पात्र असतील.
     या मेळाव्यासाठी सोलापूर, पुणे जिल्ह्यातील 13 नामवंत खाजगी आस्थापनाकडून त्यांच्याकडील विविध स्वरुपाची अंदाजे 500 पदासाठी, रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी रोजगारासाठी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे.
     तरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्यास येताना शैक्षणीक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे व एम्प्लॉयमेंट कार्ड आणावे असे, सहायक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी कळविले आहे.
 
Top