नळदुर्ग -: फेसबुकवर हजरत मुहम्मद पैंगबर यांच्याबददल अश्लील मजकूराद्वारे एका माथेफिरुने विटंबना केल्याप्रकरणी नळदुर्ग येथील मुस्लीम समाज बांधवाच्यावतीने या घटनेचा निषेध करुन फेसबुक या अनियंत्रित वेबसाईटवर बंदी घालावी व संबंधित मजकूर लिहिणा-या माथेफिरुस अटक करुन कार्यवाही करण्याची मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फेसबुक या सोशल वेबसाईटवर एका समाजकंटक व्यक्तीने हजरत मुहम्मद पैंगबरबददल घाणेरडे व अश्लील मजकूर फेसबुकवर टाकले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या असून हजरत मुहम्मद (सललाहू अलैहू सल्लम) पैगंबराबददल आमचा समाज आपले पूर्ण जीवन अर्पण करतो, जीवापाड प्रेम करतो, अशा आमच्या पैगंबराबददल अशोभनीय कृत्य करणा-या नराधमास गृहखात्याने लवकरात लवकर अटक करुन समाजाच्या निदर्शनास आणून कार्यवाही करावी. विशेष म्हणजे अशाप्रकारचे विटंबनीय मजकूर फेसबुकवर वारंवार येत आहेत. या अगोदर समाजातर्फे असेच विटंबना केल्याबाबत निवेदन देण्यात आले असून काही जातीवादी लोक भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद करुन तरीसुध्दा मुस्लीम समाज संयमाने व शांतताप्रिय मार्गाने उत्तर देत आला आहे. अशा भ्याड, अश्लील व विटंबनीय मजकूरचे अनियंत्रित प्रसारण करणा-या फेसबुक या वेबसाईटवर बंदी घालून शांतता व सुव्यवस्था कायम राखावी अन्यथा शांतता भंग करण्याचे कार्य चालूच राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर महम्मद अलीम, शेख युसुफ, मुजमील पटेल, लतीफ शेख, काझी अहमेदअली, रजाक कुरेशी, सादीकअली शेख यांच्यासह अनेकजणांच्या स्वाक्ष-या आहेत.