उस्मानाबाद : अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची आज दि. २० ऑगस्ट रोजी पुण्यात हत्या करण्यात आली. त्यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध सामाजीक आणि राजकीय संघटनानी निषेध केला आहे.
      डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पुरोगामी महाराष्ट्रात बाह्यकृत घटना रोखण्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीची स्थापना केली होती. जे लोक लोकश्रध्देच्या नावाखाली अंधश्रध्देच्या आहारी जाऊन विकृत कृत्य करतात अशांना आळा बसवण्यासाठी त्यांनी जादु टोना विधेयक प्रस्तावित केले होते. ते मंजुर होण्याच्या मार्गावर असताना त्यांची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजीक व राजकीय संघटनेने याचा निषेध नोंदवला आहे.

अंनिसकडून तिव्र निषेध
अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा उस्मानाबाद अनिस कडुन तिव्र निषेध नोंदवंला असुन याबाबत जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी वैचारीक रसद पुरवली असुन राज्य शासनाने धर्मांध प्रवृत्तीना आवर घालुन कठोर शासन करावे व दाभोळकरांना निव्वळ श्रध्दांजली न वाहता जादु टोणा व तत्सम अंधश्रध्दा विधेयक येत्या अधिवेशनात पास करावे व डॉ. दाभोळकरांची हत्या करणा-याना कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अनिसचे अ‍ॅड देवीदास वडगावकर, बालाजी तांबे, लोकप्रतिष्ठाण संघटना, मराठवाडा साहीत्य परीषदचे नितीन तावडे, राष्ट्रसेवादलाचे बुरंगे, युवराज नळे, भिमछावा समाजीक संघटना, भारतीय दलीत साहीत्य अ‍ॅकडमी, मराठवाडा शिक्षक संघ यांच्या स्वाक्ष-या असुन या सर्वांनील हल्ल्याचा निषेध केला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून श्रध्दांजली
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. त्यांच्या हत्येचा तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी समितीच्या वतीने दाभोळकर यांच्यावरील हल्लेखोरावर कडक कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यावेळी देवीदास वडगावकर, विष्णु इंगळे, भालचंद्र जाधव, नंदकुमार नन्नवरे, रवि निंबाळकर, पप्पु इंदलकर, नितीन विर, प्रकाश रणखांब, अण्णा नायगावकर, यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

आज शोकसभेचे आयोजन
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज दि. २१ ऑगस्‍ट रोजी उस्मानाबाद शहरातील यशश्री क्लासेस येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सांयकाळी साडेवाजता या शोकसभेचे आयोजन करण्यात आले असुन सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top