सोलापूर -: सोलापूर शहरवासियांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्याची विनंती वंदे मातरम युवक संघटनेचे श्याम खंडेलवाल यांनी पत्रकादवारे केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ठिकठिकाणी घाणीचे दृश्य पाहायला मिळते. शहरात आपले सर्वांचे घर असून परंतु आपण शहर घाण ठेवून व फक्त आपले घर स्वच्छ ठेवतो. ही आपली स्वार्थी वृत्ती आहे. शहर सुंदर असेल, परिसर सुंदर असेल तरच आपल्या घराला शोभा येईल. महानगरपालिका व आपण सर्व नागरीक यांच्यामध्ये एकोपा, सामंजस्य साधून सर्वांनी शहराला एक स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन दयावे. याप्रश्नी ज्या-त्या परिसरातील तरुण वर्गांनी आपापल्या वार्डाची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि या कार्याला महानगरपालिकेने परिपूर्ण सहकार्य करायला हवे.
यात चुक महानगरपालिकेच्या ब-याच कामगारांची आहे आणि त्यापेक्षा जास्त एक आपण सर्व सुज्ञ नागरिकांचाही आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण ज्यावेळेस महापालिकेचे कर्मचारी कचरा साफ करुन ते नवीन अंमलात आणलेल्या घंटागाडीच्यावतीने उचलून घेऊन जातात. त्यानंतर आपणापैकी बरेच नागरीक दिवसभर त्याठिकाणी कचरा टाकत असतात आणि तोच कचरा संपूर्ण परिसरात पसरतो. त्यामुळे सर्वत्र घाण पसरते, त्यात पाणी पडल्याने चिखल होते, त्या परिसराजवळच आपली मुले खेळत असतात, त्याच घाणीत जनावरे दिवसभर आपली ठिय्या मारुन असतात व याच घाणीमुळे ताप, डेंगू, मलेरिया अशा विविध रोगांना आपण आमंत्रण देत आहोत.
सोलापूर शहर स्वच्छतेबददल महत्त्वाचे मुददे :
* शहरातील मोठे रस्ते, गल्ली-बोळ व्यवस्थित झाडले जात नाही. फक्त कचरा उचलला जातो. रस्त्यावरील मातीही साफ केली जात नाही.
* रस्त्याच्या दोन्ही कडेला, कोना कोप-याला मातीची ढिग पडलेले दिसून येतात, ते उचलण्यात यावे.
* शहरात ज्यांचे पडीक घर, खुल्या जागा आहेत. त्यामध्ये मातीचे व घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे शहरभर ती धुर पसरते, त्यासाठी संबंधित घरमालकाला ती जागा साफ साफ करायला लावणे अथवा त्या जागेभोवती कंपाऊंड मारायला लावणे गरजेचे आहे.
* नगरसेवकांनी स्वच्छतेविषयी एखादे पत्रक काढून नागरिकांची समजूत काढावी.
* एक तर गाडीतच कचरा टाकावा किंवा ज्या कचरा डब्यात टाकतो, त्याची वेळ निश्चित करायला लावावी (सकाळी 7 किंवा 8 च्या अगोदर) त्यानंतर कुणीही घरच्या बाहेर कचरा टाकू नये, असे आदेश महापालिकेच्यावतीने काढण्यात यावेत.
* आपला परिसर फक्त सण, जयंती उत्सव साजरे करण्यासाठी आहे काय? आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी आपली नाही काय?
* ज्या कचरा-घाणीचा वास आपण जवळूनही सहन करु शकत नाही, त्या घाणीत मनपा कर्मचारी व घंटा गाडीवाले हाताने तो कचरा-घाण उचलतात, त्यांचाही विचार करा.