सोलापूर :- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूवर व डाळिंब उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 ऑगस्ट 2013 रोजी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालययेथे डाळिंब उत्पादक शेतक-यांचे चर्चासत्र आयोजित केलेले असून या चर्चासत्राचे उद्घाटन आमदार दिपकआबा साळूंके- टील (आमदार विधानपरिषद) तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भारत भालके (आमदार पंढरपूर विधानसभा) भुषविणार आहेत.
    डाळिंब चर्चासत्रासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. तुकाराम मोरे (कुलगुरु महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी) डॉ. आर. के. पाल (संचालक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर) डॉ. श्रीमंत रणपीसे (प्रमुख फलोत्पादक विभाग, म.फु. कृ. वि. राहुरी) व डाळिंब संशोधन केंद्राकडील शास्त्रज्ञ उपस्थित राहून डाळिंब लागवड तंत्रज्ञान, डाळिंब किड व रोग व्यवस्थापन व डाळिंब पिकाचे पाणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
    तरी सर्व डाळिंब उत्पादक करणा-या शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, सदर चर्चासत्रात उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे डी.एस. गवसाने, प्रकल्प संचालक, आत्मा सोलापूर व अंकुश पडवळे, अध्यक्ष शेतकरी सल्ला समिती आत्मा मंगळवेढा यांनी केले आहे.           
 
Top