सोलापूर -: पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री ना. दिलीप सोपल हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
      गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, सोलापूर येथे आगमन. सकाळी 9.05 वा. भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थिती (स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, सोलापूर) सकाळी 11 वा.  ना. आर.आर. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - न्यु हायस्कुल, सलगर वस्ती डोणगांव रोड, सोलापूर) सोयीनुसार शासकीय वाहनाने बार्शीकडे प्रयाण.   
      तसेच दुस-या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. केद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या समवेत उजनी धरण येथील जलपुजनास उपस्थित राहतील. दुपारी 4 वा. टेंभूर्णी येथे आगमन व नवीन पाणी पुरवठा योजनेच्या भुमिपूजन समारंभास उपस्थिती. सायं 5 वा. शासकीय वाहनाने टेंभूर्णी येथून माळीनगर (अकलूज) कडे प्रयाण. सायं 6 वा. माळीनगर (अकलूज) येथे आगमन व साखर कारखाना कार्यक्रमास उपस्थित राहून रात्रौ सोईनुसार शासकीय वाहनाने बार्शीकडे प्रयाण करतील.
 
Top